समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरील सुनावणी १७ फेब्रुवारीला
![Hearing on caste certificate of Sameer Wankhede on 17th February](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/sameer.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र बाबत दाखल झालेल्या याचिकेवर, आज मुंबई जिल्हा जात पडताळणी कार्यालयात सुनावणी होणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हि सुनावणी १७ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
समीर वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली असा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे खोटे जात प्रमाणपत्र असल्याची तक्रार एका तक्रारदाराकडून करण्यात आली होती. आणि या संदर्भात नोव्हेंबर महिन्यात तक्रारदाराला समितीने कागदपत्र घेऊन कार्यालयात बोलावले होते. तक्रारदार अशोक कांबळे याचे वकील कागदपत्र घेऊन कार्यालयात पोहचले होते. आणि त्यांनी कागदपत्र संबंधित अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार प्रथमदर्शनी समितीने या तक्रारीची गंभीर दखलघेऊन तक्रारदा आणि वानखेडे यांना दोघानाही पुढील चौकशीसाठी बोलावले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हि सुनावणी आता १७ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
क्रुझवरील रेव्ह पार्टीवरधाडी एनसीबीने टाकलेल्या धाडीनंतर अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. समीर वानखेडे हे जातीने मुस्लीम असून त्यांचा पूर्वी एका मुस्लीम महिला डॉक्टर बरोबर मुस्लीम पद्धतीने निकाह झाला होता. त्यांचे खरे नाव समीर दावूद वानखेडे असे असून त्यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवली होती आणि त्याची चौकशी व्हायला हवी होती अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्यानंतर वानखेडे यांच्या विरोधात त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे आणि त्यावर जात पडताळणी समितीकडे सुनावणी सुरु आहे.