breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
मोठा दिलासा! अनलॉकच्या प्रक्रियेत महिलांसाठी लोकल सुरू होणार
![Great relief! Local for women will start in the process of unlock](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/local-train-2.jpg)
मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन पुन्हा एकदा बंद करण्यात आली होती. मात्र, आता राज्यात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू असल्याने पाच टप्प्यात हळूहळू सर्व सुरळीत करण्यात येणार आहे. यातच, मुंबई ही दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये येत असून सोमवारपासून शहरातील निर्बंध शिथिल होणार आहे. त्यामुळे या टप्प्यात महिलांना पुन्हा एकदा लोकल प्रवास करता येणार आहे.
मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेनने प्रवास करता येत होता. मात्र, आता महिलावर्गाला लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय, मुंबईतील मल्टिप्लेक्स, मॉलही 50 टक्के क्षमतेने सुरु केले जाणार आहेत.