breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ED च्या मुंबईमधील कार्यालयावर शिवसैनिकांनी लावला ‘भाजपा प्रदेश कार्यालया’चा बॅनर
![Shiv Sainiks put up a banner of 'BJP Pradesh Office' at ED's Mumbai office](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ED-office-bjp-poster.jpg)
मुंबई – खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना उद्या ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यावरून सध्या राज्यातील राजकारण पेटलं आहे. तसेच, या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषद घेत संजय राऊतांनीही भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.
शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला.