breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई विमानतळावर २४७ कोटींचे ड्रग जप्त

मुंबई – नार्कोटिक सेल आणि इतर तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या ड्रग विरोधी मोहिमेत आज डीआय आर ला मोठे यश आले असून आज मुंबई विमानतळावर तब्बल 35 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात २४७ कोटी इतकी किमत आहे. गेल्या दोन महिन्यातील मुंबई विमानतळावरील हि सहावी मोठी कारवाई आहे, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

झिन्बाब्बेवरून आलेल्या दोन इसमाच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे हे ३५ किलो ड्रग्ज सापडले. त्यानंतर डीआरआयने त्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु असून, हे ड्रग्ज त्यांनी कुठून आणि कोणासाठी आणले होते, याची माहिती घेतली जात आहे. कारण गेल्या दोन महिन्यात मुंबई विमानतळावर ज्या ज्या ड्रग तस्करांना अटक करण्यात आले होते , त्या सर्वांपेक्षा काल ताब्यात घेतलेल्या ड्रग तस्करांकडून अधिक ड्रग सापडले आहे. या दोघांच्या चौकशीतून मुंबईतील काही ड्रग पेड्लर आणि त्यांचे ग्राहक यांची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button