ताज्या घडामोडीमुंबई

लोकल प्रवासात विघ्ने ; कामांसाठी वेगमर्यादेत बदल; वेळापत्रकात महिनाभर बिघाड

मुंबई | ठाणे ते दिव्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या जलद रेल्वे मार्गिकेचे काम करण्यासाठी लोकल गाडय़ांच्या कमी केलेल्या वेगमर्यादेमुळे प्रवाशांना आणखी महिनाभर प्रवासविघ्नांचा त्रास होण्याची शक्यता आहे.ठाणे ते दिवा स्थानकापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या जलद मार्गिकेच्या कामांसाठी गेल्या काही दिवसांपासून लोकल गाडय़ांसाठी कमी वेगमर्यादा निश्चित केली आहे. लोकलचा वेग मंदावल्याने वेळापत्रकातही बिघाड होत आहे. अप आणि डाऊन जलद लोकल गाडय़ा विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मंदावलेला लोकलवेग फेब्रुवारी अखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून त्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीतच राहील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळावी आणि लोकल रेल्वे गाडय़ाही वेळापत्रकानुसार चालाव्यात यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यासाठी १४ ते ७२ तासांपर्यंतचे मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामाला १५ दिवसांपासून गती दिली गेली आहे. मेगाब्लॉक घेऊन किरकोळ कामांबरोबरच मोठी कामेही केली जात आहेत. ती पूर्ण करण्यासाठी ठाणे ते दिव्यादरम्यान जलद मार्गावर लोकल गाडय़ांसाठी ठिकठिकाणी वेगमर्यादा निश्चित केली आहे. जलद लोकल गाडय़ांसाठी साधारण ताशी ३० किलोमीटर ते ४० किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आल्याने वेळापत्रकावर परिणाम होत असून गाडय़ा २० मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत आहेत. परिणामी, जलद प्रवाशांचा प्रवासकालावधी लांबत असून त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि परतीच्या प्रवासात जलद लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते आणि करोना साथीच्या काळातही गर्दीमध्ये गुदमरत प्रवास करावा लागतो. दुसरीकडे जलद लोकल उशिराने धावत असल्याने त्या गाडय़ांचे प्रवासी धीम्या लोकलकडे वळतात आणि याही गाडय़ांना गर्दी होते.

ठाणे ते दिव्यादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी जलद मार्गावर लोकलची वेगमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे वेळापत्रक बिघडले आहे. गाडय़ा सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहेत. जलद मार्गावरील प्रवाशांचा प्रवासकालावधी वाढला आहे. करोना साथ असतानाही गर्दीत गुदमरून प्रवास करावा लागत आहे.

त्रास असा.. पाचव्या-सहाव्या जलद मार्गिकेचे काम संपल्यानंतरही त्या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांवर साधारणपणे फेब्रुवारी अखेपर्यंत वेगमर्यादेचे बंधन असेल. रुळ, ओव्हरहेड वायरसह सर्व तांत्रिक बाबी नव्या असल्याने ही दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडय़ा २०-३० मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

रेल्वचे म्हणणे.. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, ते म्हणाले की, ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी काही ठिकाणी लोकलसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र ही ती आणखी आठवडाभर असेल.

ठाणे ते दिव्यापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या जलद रेल्वे मार्गिकेचे काम करण्यासाठी लोकल गाडय़ांच्या कमी केलेल्या वेगमर्यादेमुळे प्रवाशांना आणखी महिनाभर प्रवासविघ्नांचा त्रास होण्याची शक्यता आहे.ठाणे ते दिवा स्थानकापर्यंतच्या पाचव्या आणि सहाव्या जलद मार्गिकेच्या कामांसाठी गेल्या काही दिवसांपासून लोकल गाडय़ांसाठी कमी वेगमर्यादा निश्चित केली आहे. लोकलचा वेग मंदावल्याने वेळापत्रकातही बिघाड होत आहे. अप आणि डाऊन जलद लोकल गाडय़ा विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मंदावलेला लोकलवेग फेब्रुवारी अखेपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून त्यामुळे गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीतच राहील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान मेल, एक्स्प्रेस गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळावी आणि लोकल रेल्वे गाडय़ाही वेळापत्रकानुसार चालाव्यात यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यासाठी १४ ते ७२ तासांपर्यंतचे मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. या कामाला १५ दिवसांपासून गती दिली गेली आहे. मेगाब्लॉक घेऊन किरकोळ कामांबरोबरच मोठी कामेही केली जात आहेत. ती पूर्ण करण्यासाठी ठाणे ते दिव्यादरम्यान जलद मार्गावर लोकल गाडय़ांसाठी ठिकठिकाणी वेगमर्यादा निश्चित केली आहे. जलद लोकल गाडय़ांसाठी साधारण ताशी ३० किलोमीटर ते ४० किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आल्याने वेळापत्रकावर परिणाम होत असून गाडय़ा २० मिनिटे ते अर्धा तास उशिराने धावत आहेत. परिणामी, जलद प्रवाशांचा प्रवासकालावधी लांबत असून त्यांना मोठा मनस्ताप होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि परतीच्या प्रवासात जलद लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होते आणि करोना साथीच्या काळातही गर्दीमध्ये गुदमरत प्रवास करावा लागतो. दुसरीकडे जलद लोकल उशिराने धावत असल्याने त्या गाडय़ांचे प्रवासी धीम्या लोकलकडे वळतात आणि याही गाडय़ांना गर्दी होते.

ठाणे ते दिव्यादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येत आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी जलद मार्गावर लोकलची वेगमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे वेळापत्रक बिघडले आहे. गाडय़ा सुमारे अर्धा तास उशिराने धावत आहेत. जलद मार्गावरील प्रवाशांचा प्रवासकालावधी वाढला आहे. करोना साथ असतानाही गर्दीत गुदमरून प्रवास करावा लागत आहे.

त्रास असा.. पाचव्या-सहाव्या जलद मार्गिकेचे काम संपल्यानंतरही त्या मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांवर साधारणपणे फेब्रुवारी अखेपर्यंत वेगमर्यादेचे बंधन असेल. रुळ, ओव्हरहेड वायरसह सर्व तांत्रिक बाबी नव्या असल्याने ही दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडय़ा २०-३० मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

रेल्वचे म्हणणे.. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, ते म्हणाले की, ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी काही ठिकाणी लोकलसाठी वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र ही ती आणखी आठवडाभर असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button