breaking-newsमुंबई

#CoronoVirus:मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, ड्रायव्हरमुळे संसर्ग

मुंबई : मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची  लागण झाली आहे. ड्रायव्हरमुळे आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह राज्यभरात जवळपास साडेतीनशे पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईतील जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील पोलीस दलात कोरोनाच्या संसर्गात वाढल्याचं चित्र आहे. हा अधिकारी दक्षिण मुंबईत नियुक्त आहे. या अधिकाऱ्याचा ड्रायव्हर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या अधिकाऱ्यास कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. पण त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर आता या अधिकाऱ्यास होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button