breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | 60 वर्षांवरील रुग्णांवरच मोठ्या रुग्णालयात उपचार

मुंबई : मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये सर्वाधिक 60 वर्षांवरील रुग्ण  आहे. त्यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार आणि खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार करणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

60 वर्षांखालील आणि लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांवर मात्र मॅटरनीटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 278 झाला असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे 60 वर्षांवरील असून या रुग्णांना इतरही आजार असल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार करण्याचे एसओपीमध्ये सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button