breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: ३७ हजारांहून अधिक धारावीकर अलगीकरणात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-890x395-3.png)
लघुउद्योगांचे एक छोटे केंद्र आणि सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीमध्ये करोनाचा थैमान सुरू आहे. आजघडीला धारावीतील करोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३७ हजारांहून अधिक धारावीकरांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ पालिके वर ओढवली आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्याच दिवशी संध्याकाळी शीव रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर धारावीमध्ये सातत्याने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परिणामी अवघ्या काही दिवसांमध्येच धारावीतील करोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली आहे.