breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus |सरकारचे दिवसाला एक लाख कोरोना टेस्टचे लक्ष्य
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Corona-blood-1.jpg)
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या देशभरातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. सध्याच्या घडीला देशभरात दिवसाला साधारण १५ हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.
मात्र, येत्या काही दिवसांमध्ये दिवसाला एक लाख कोरोना टेस्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी ३० एप्रिलपर्यंत देशभरात आणखी ३०० कोरोना लॅब उभारण्याचा सरकारचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबतच्या सूचना दिल्या. त्यानुसार येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिवसाला एक लाख टेस्ट करण्याचे लक्ष गाठायचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते.