breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: श्रीवर्धन, पोलादपूर आणि नेरळकरांना दिलासा; सर्व संशयीत रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे पाच, पोलादपूर येथील तीन जणांना तर नेरळ येथील एकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांची तपासणी करण्यात आली. मात्र, सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे श्रीवर्धन, पोलादपूर आणि नेरळ येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात रविवारी सात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.