Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: वसई-विरारमध्ये १५ नवे कोरोनाचे रुग्ण; ४ दिवसांच्या बाळालाही कोरोना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-11.jpg)
शनिवारी वसई विरारमध्ये करोनाचे नवे १५ रुग्ण सापडले. त्यानंतर वसई विरारमधील करोनाग्रस्तांची संख्या ही ८३ वर पोहोचली आहे. पालिकेच्या सर डीएम पेटीट आणि नायगावच्या माता बालसंगोपपन केंद्रातील १२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नालासोपाऱ्यात ४ दिवसांच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून वसईत एका महिलाचा मृत्यू झाला आहे.