breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत २४ तासात १४१३ नवे रुग्ण, ४० मृत्यू
मुंबईत गेल्या २४ तासात १४१३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या आता ४० हजार ८७७ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ४० जणांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता निश्चितच वाढली आहे. ३४ नवे रुग्ण धारावीत आढळले आहेत. त्यामुळे धारावीतल्या रुग्णांची संख्या १८०५ इतकी झाली आहे असंही मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.
40 deaths & 1413 new COVID19 positive cases reported in Mumbai today; total number of positive cases in Mumbai is now 40,877: Municipal Corporation Greater Mumbai pic.twitter.com/PYBN640v1W
— ANI (@ANI) June 1, 2020