breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | मुंबईत करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; १५ नवे रुग्ण आढळले

मुंबई | मुंबईत करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनामुळे दगावलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्याशिवाय राज्यात आणखी १५ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ८९वर गेली आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा रोजच वाढत चालल्याने परिस्थिती चिंताजनक होत चालल्याचं सूत्रांनी सांगितलं.नवी मुंबईत राहणारा हा ६८ वर्षीय व्यक्ती फिलीपाइन्सचा आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. या व्यक्तिचा करोनाचा प्राथमिक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला होता. सुरुवातीला त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तिला दम्याचा आणि मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लक्षणं आढळल्याने त्याला १३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button