breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: मुंबईतील वरळी कोळीवाड्यात सापडले कोरोनाचे 4 संशयित; पोलिसांकडून परिसर सील

मुंबई आणि उपनगरांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे संशयित रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली असून, पोलिसांनी खबरदारी म्हणून हा परिसर सील केला आहे. तसंच महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून, शंभराहून अधिक जणांना लागण झाल्यानं विशेष खबरदारी घेतली जात आहे. वरळी कोळीवाड्यात चार संशयित सापडले आहेत. याबाबत पोलिसांकडून उद्घोषणांद्वारे माहिती दिली जात आहे.

खबरदारी म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. रस्त्यांवर बॅरिकेड्स लावल्या असून, नागरिकांना मज्जाव केला जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून परिसरात निर्जुंतुकीकरण केलं जात आहे. दरम्यान, करोना संशयितांमधील एकानंही विदेशातून प्रवास केल्याचा इतिहास नाही. याशिवाय या चौघांपैकी कुणीही कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेलं नसल्याचीही माहिती समोर आली आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button