#CoronaVirus: मुंबईतल्या 800 लोकांना ‘हे’ कुटुंब पुरवत जेवण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-290.png)
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका मुंबईमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर, रिक्षाचालक यांना बसत आहे. दोन वेळचे जेवण देखील त्यांना मिळत नाही. अशा परिस्थितीत मुंबईतील इब्राहिम मोतीवाला यांचे कुटुंब त्यांच्यासाठी ‘अन्नदाता’ झाले आहे. मुंबईतल्या जवळपास ८०० लोकांना हे कुटुंब जेवण पुरवत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-4.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/2-5.png)
लॉकडाऊनमुळे मुंबईमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर, रिक्षाचालक यांच्या हातात काम नाही. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक मुंबईकर त्यांच्या मदतीसाठी पुढे धावून आले आहेत. यापैकीच एक इब्राहिम मोतीवाला यांचे कुटुंब आहे. ते गरजूंना आणि गोरगरिबांना जेवणाचा पुरवठा करत आहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/5-22-1024x576.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-52.png)
मोतीवाला कुटुंबिय गोरगरिबांसाठी फक्त जेवण तयार करत नाही. तर ते त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम देखील कर आहे. इब्राहिम मोतीवाला यांनी सांगितले की, ‘लॉकडाऊनमुळे मुंबई बरेच कामगार अडकले आहेत. त्यांना जेवण मिळत नाही. जर अशा लोकांना मदत करण्यासाठी देवाने आपल्याला पात्र केले असेल तर आपण मदत केली पाहिजे. आम्ही दरोरोज ८०० माणसांचे जेवण तयार करतो. जेवणाची पाकिटं तयार करुन ती गोरगरिबांमध्ये वाटतो.’