breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर, इस्लामपूरचं कुटुंब बाधित

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या संकटाच्या भीषणतेची तीव्रता लक्षात येत आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 41
पुणे – 19
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 9
कल्याण – 5
नवी मुंबई – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
ठाणे – 3
सातारा – 2
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button