breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: नागाव ग्रामपंचायतीकडून चाकरमान्यांची कॉटेजेसमध्ये मोफत सोय

करोनाच्या भीतीने मुंबई -पुण्यातील चाकरमान्यांनी आपल्या गावाकडे धाव घेतलीय. या सर्वाना ठेवायचं कुठं असा प्रश्न ग्रामस्थांना पडलाय. परंतु अलिबागच्या नागाव ग्रामपंचायतीने त्यांच्यासाठी हायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याही अगदी मोफत.  गावातील कॉटेजेसमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी अलगीकरणात राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य नागाव. इथं पर्यटन व्यवसाय नेहमीच तेजीत असतो. परंतु टाळेबंदीमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. आता  इथल्या  कॉटेजेसचा उपयोग अलगीकरण केंद्र  म्हणून करण्यात आला आहे. मुंबई- पुण्यातून येणाऱ्या चाकरमान्यांना या कॉटेजेसमध्ये ठेवलं जात आहे. इथल्या कॉटेज मालकांनी आपल्या कॉटेजेस त्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.  त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही. ग्रामीण भागात क्वारंटाईनची समस्या जटील होत आहे.

मात्र नागावकरांनी चाकरमान्यांना हायफाय सुविधा दिल्यात. कॉटेजमालकांच्या  सहकार्यामुळे हे शक्य झालं आहे.

केवळ कॉटेजेस नाही तर स्वच्छतेची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील ग्रामपंचायतीने केली आहे. अगदी वायफायदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही कॉटेजेस नियमितपणे सॅनिटायजर्स केली जातात. क्वारंटाइन असलेल्या व्यक्ती किंवा कुटुंबाची नियमित विचारपूस केली जाते. त्यांना काय हवं नको तेदेखील पाहिले जाते. पाहुण्यासारखी त्यांची काळजी घेतली जात आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य दिवसभर मेहनत घेत असतात. सरपंच निखील म्हात्रे  या संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

महत्वाचं म्हणजे त्यासाठी फुटकी दमडीही खर्च होत नाही. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या पाहुणचाराने चाकरमानी भलतेच खुश आहेत. नागाव ग्रामपंचायतीच्या हाकेला ओ देत कॉटेजमालकांनी दाखवलेलं औदार्य नक्कीच स्वागतार्ह आहे.

चाकरमान्यांची समस्या गंभीर होती. गावात भीतीचे वातावरण होते. परंतु आम्ही इथल्या  कॉटेज मालकांना विनंती केली त्यांनी तात्काळ होकार दिला आणि आमचा प्रश्न सुटला. सध्या आमच्याकडे ५० सर्व सुविधायुक्त खोल्या उपलब्ध आहेत. या कामात कॉटेजमालकांचे योगदान मोठे आहे.

– निखिल मयेकर, सरपंच नागाव

आम्ही नवीमुंबईहून आलो आहोत. ग्रामपंचायतीने आमची खूप चांगली सोय केली आह. आमचं कुटुंब इथं आनंदाने राहत आहे. केवळ रूम नाही तर इतरही सर्व बाबतीत आमची सोय केली जाते. दिवसातून ३ वेळा आमची विचारपूस केली जाते. आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे आभारी आहोत.

– जितेंद्र गुरव , चाकरमानी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button