breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धक्कादायक! तीन दिवसांच्या बाळासह आईलाही कोरोनाची लागण
चेंबूरच्या खासगी रुग्णालयात तीन दिवसांच्या बाळासह तिच्या आईला करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतक्या छोटय़ा बाळाला संसर्ग होण्याची ही देशातील पहिलीच घटना मानली आहे.
खासगी रुग्णालयात २६ मार्चला एका महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर तिला आणि तिच्या बाळाला एका विशेष खोलीत हलविण्यात आले. त्यानंतर २४ तासांच्या आतच आम्हाला या खोलीतून दुसरीकडे जाण्यास सांगण्यात आले, असे या महिलेच्या पतीने सांगितले. खासगी प्रयोगशाळेत साडेतेरा हजार रुपये खर्च करून माझ्यासह पत्नी आणि बाळाची करोना चाचणी केली. त्यात पत्नीसह बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.