12 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना लस; नोंदणीला झाली सुरुवात
![Complaints of corporators about lack of planning in vaccination campaign](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/childVaccine-1201311282-770x533-1-650x428-1.jpg)
मुंबई – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यातच संपूर्ण देशभरात सर्वाधिक लसीकरण एकट्या महाराष्ट्र राज्यात झालं आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर आता लहान मुलांनाही कोरोना लस देण्यात येणार आहे.
देशात तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. त्यानुसार लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. झायडस कॅडीला या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात पत्र दिलं होतं. कंपनीने मुंबई महापालिकेच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईतील नायर रुग्णालयात झायकोडी ही लहान मुलांसाठी विकसित करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस 50 मुलांना सुरुवातीला देण्यात येणार आहे. सोमवारपासून लहान मुलांच्या लसीकरणाला च्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे व पहिल्याच दिवशी 2 मुलांनी नोंदणी देखील केल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईत दुसऱ्या लाटे तील कोरोना टोक्यात आला असताना आता लहान मुलांना तिसर्या लाटेत धोका असल्यामुळे लसीकरणाला करण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयातही लहान मुलांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.