राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर
![Chief Minister at Raj Bhavan to wish the Governor a happy birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Capturecyfyfugiohukhv.jpg)
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राजभवन येथे राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी जी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. pic.twitter.com/6ffWBCbd89
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 17, 2021
दरम्यान, ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे चित्र पाहायला मिळाले होते. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवळण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती, या भेटीनंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेतली असावी अशा चर्चांनाही उधाण आले आहे.