मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विधान भवन आवारात महिला पोलिसांनी बांधल्या राख्या
![Chief Minister and Deputy Chief Minister were tied by the women police in the Vidhan Bhavan premises](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Chief-Minister-and-Deputy-Chief-Minister-were-tied-by-the.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणि अतुट नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आज 11 ऑगस्टला म्हणजे गुरुवारी सगळीकडे रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. या सणाची प्रत्येक भाऊ आतुरतेने वाट पाहत असतो. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सासरी गेलेली प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या घरी येत असते. आपल्या लाडक्या बहिणीची माहेरी येण्याची भाऊ वाट पाहत असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य आणि सुख लाभो मिळो यासाठी प्रार्थना करतात त्याचप्रमाणे भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. रक्षाबंधन सणानिमत्त प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला शुभेच्छा देत हा सण साजरा करत असते. आज रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विधान भवन आवारात महिला पोलिसांनी राख्या बांधल्या. अशा प्रकारे विधान भवन परिसरात रक्षाबंधन सण आनंदात साजरा करण्यात आला.