breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमुंबई

सेन्सेक्सनं आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला, ८० हजारांचा टप्पा पार, निफ्टीही सुसाट

Stock Market Updates | शेअर बाजारानं आज नवा विक्रम रचला आहे. आज सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८०,००० चा टप्पा पार केला. सेन्सेक्ससोबतच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टी निर्देशांकही रॉकेटच्या वेगानं धावला आणि २४,२९१.७५ च्या नव्या शिखरावर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात भागधारकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सनं ०.७२ टक्क्यांची भर घालत ८०,०१३.७७ अंकांवर मजल मारली. शेअर बाजाराच्या आजपर्यंतच्या इतिहासात सेन्सेक्स ८० हजारांच्या वर गेला नव्हता. त्याचवेळी निफ्टी५०नंही आपला जोर कायम ठेवला. ०.७ टक्क्यांची भर घालत निफ्टीनं २४,२९१.७५ अंकांपर्यंत घोडदौड केली.

हेही वाचा    –      ‘जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनावर भर द्या’; जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

निफ्टीच्या आजच्या कामगिरीमध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्सच्या किमती ३.५ टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी झेप घेतल्यामुळे बँकिंग, वित्तसेवा आणि खासगी बँकांच्या शेअर्सनंही नफ्याच्या दिशेनं वाटचाल करत १.३ टक्के ते १.५ टक्क्यांपर्यंत मजल मारली.

एचडीएफसी बँकेप्रमाणेच आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि नेस्ले यांनी चांगली कामगिरी केली. त्याचवेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टिसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, टाटा मोटर्स यांचे शेअर्स खाली आल्याचं दिसून आलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button