मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण
![Re-scarcity of ‘covishield’; Only the covacin vaccine will be available on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/914328-corona-vaccine-1.jpg)
नवी मुंबई – मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतूनही बोगस लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. ज्यांनी कांदिवलीत बोगस लसीकरण केले त्यांनीच नवी मुंबईत हे कृत्य केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसीतील एटोमबर्ग टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीतील 350 कर्मचाऱ्यांचे बोगस लसीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डॉ. मनिष त्रीपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ त्रिपाठी याने याआधी मुंबईतील कांदिवली येथे बोगस लसीकरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कांदिवली येथे गुन्हा दाखल केला होता. आता शिरवणे एमआयडीसीतील प्रकारानंतर तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, मुंबईतील बोगस लस प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते.