‘पोलीस यंत्रणेवर दबाव नसल्यानेच…’, भाजप महिला नेत्याचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र
![BJP women leader criticizes Thackeray government over lack of pressure on police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Untitled-design-30.png)
मुंबई – जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. जळगावचे प्रकरण चर्चेत असतानाच आता औरंगाबादमधील डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
औरंगाबादमधील पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने कोरोना व्हायरसची लागण झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश औरंगाबादचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत. मात्र या प्रकरणावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत पोलीस यंत्रणेवर सरकारटा दबाव नसल्यानेच अशा घटना घडत असल्याची टीका केली आहे.
वाचा :-‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप
भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उमा खापरे म्हणाल्या की, औरंगबादच्या घटना असो अथवा जळगावची या घटनांची चौकशी व्हायला हवी. या राज्यात महिला सुरक्षित नाही.
या सरकारचा दबाव ना पोलीस यंत्रणेवर आहे, ना प्रशासनावर आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो व त्या डॉक्टराची ताबडतोड चौकशी करून, त्यांचा राजीनामा घ्या. जळगाव प्रकरणातील नरधामांना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी उमा खापरे यांनी केली आहे.