Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणेंची राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
![BJP leader Nilesh Rane's demand for imposition of presidential rule in the state over Sachin Waze case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/nilesh-rane-and-uddhav-thackeray.jpg)
मुंबई |
सचिन वाझे प्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवालही निलेश राणे यांनी केलेला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
वाचा- वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र