breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी : माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित, शरद पवारांची घेतली भेट

मुंबई । प्रतिनिधी

शिराळा तालुक्यातील माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबईत भेट घेतली.

यावेळी शरदपवार म्हणाले की, आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया. आज शिवजीरावांनी वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मा. खासदार पवारसाहेब व इतर मान्यवरच्या उपस्थित २ एप्रिल २०२२ शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन प्रवेश होईल, असेही सांगितले.

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button