‘कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी…’; फडणवीसांचा शिवसेना आमदाराला टोला
![OBC reservation gone due to state government's refusal - Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/devendrafadnavis-pti.jpg)
मुंबई : मला करोनाचे जंतू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं.
मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा, असे टोला फडणवीसांनी गायकवाडांना लगावला.
दरम्यान, यावेळी फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. जेव्हापासून नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीने अटक केली आहे, तेव्हापासून ते अगदी पिसाळल्यासारखे, विनाकारण केंद्र सरकारविरोधात, विना पुरावा बोलत असतात, अशी टीका फडणवीसांनी केली.