Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईतील अनेक परिसरात बत्ती गुल; नागरिकांची कामे खोळंबली
![Batti Gul in many areas of Mumbai; The work of the citizens was ruined](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/light-1.jpg)
मुंबई – मुंबईतील आज अनेक परिसरांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दादर माटुंगा सायन भागात वीज गायब झाल्याची माहिती मिळत आहे.मुंबईतील दादर, सायन, माटुंगा, वरळी, परळ करीरोड परिसरात अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज पुरवठा खंडीत का झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
टाटा पावर ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने भायखळा ते दादर दरम्यानचा वीजपुरवठा खंडीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, वीज पूरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे.