आर्यन खानला दिलासा नाहीच! तुरुंगातील मुक्काम वाढला, पुढील सुनावणी बुधवारी
![Aryan Khan finally granted bail in cruise drug party case, will be released from jail tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Aryan-Khan.jpg)
मुंबई – क्रूज ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार असून आता या प्रकरणावर बुधवारी दुपारी पावणे तीन वाजता सुनावणी होईल.
शनिवारी मुंबई लोअर कोर्टाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. लोअर कोर्टाचे म्हणणे होते की, एनडीपीएसच्या ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे, त्या कलामांतर्गत जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यानंतर आर्यन खानकडून नवा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी एनसीबीने याचिकेवर उत्तर देण्यासाठी किमान 2 ते 3 दिवसांचा वेळ देण्याची विनंती न्यायालयात केल्याने आजची सुनावणी टळली असून आता थेट बुधवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, आज आर्यन खानच्या जामिनावरील पुढील सुनावणी कधी घ्यावी यावरून सरकारी वकील आणि ऍड. अमित देसाई यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसले. देसाई यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्याची विनंती केली. मात्र विशेष सरकारी वकील सेठना यांनी गुरुवारी सुनावणी घेण्याची विनंती केली. यावर न्यायालयाने बुधवारी सुनावणी ठेवली.