राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं
![A campaign against Deshmukh to achieve political goals; Jayant Patil narrated](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Jayant-Patil-and-Fadanvis.jpg)
मुंबई |
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या प्रकरणात संबंधित असलेल्या इतरांवर गुन्हा दाखल केला असून, देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या घर आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नामोल्लेख न करता भाजपाला सुनावलं आहे. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच सीबीआयचं धाडसत्र सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांत सीबीआयकडून झाडाझडती सुरू असल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले? याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे,” असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. “या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.
या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021
परबीर सिंहांचे आरोप… न्यायालयाचे आदेश आणि सीबीआय छापेमारी
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सीबीआयकडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह प्रकरणातील संबंधित इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांच्या घर व कार्यालयांसह १० ठिकाणी छापेमारी केली आहे.
देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्याचीही सीबीआयने झाडाझडती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरा सीबीआयच्या पथकाने छापेमारी केली आणि पहाटे हे पथक निघून गेल्याचं समजते. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं वृत्त असून, इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले आहेत. सीबीआयकडून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं वृत्त आहे. देशमुख यांच्या नागपूरातील निवासस्थानीही सीबीआयने छापा टाकला असून, घराची झाडाझडती सुरू आहे.
वाचा- #Covid-19: करोना उपचारासाठी ‘झायडस कॅडिला’चे औषध प्रभावी