मुंबईत आज १९ हजार नवे रुग्ण; आठ हजार कोरोनामुक्त
![19,000 new patients in Mumbai today; Eight thousand corona free](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/virus-viruses-coronavirus-4835301.jpg)
मुंबई | मुंबईत गेले काही दिवस २० हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना आज जरा दिलासा मिळाला आहे. कारण आज १९ हजार ४२७ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय आहेत.मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आज १९ हजार ४२७ नवे बाधित असून आज सात मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 8 हजार 63 जणांनी कोरोनावर मात केलीय. ज्यामुळं मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 78 हजार 119 वर पोहचलीय. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर गेलाय.
मुंबईत आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी 1 हजार 240 रुग्ण हे आज रुग्णालयात भरती झाले आहेत. मुंबईत दिवसभरात एकूण 68,249 कोरोना चाचणी करण्यात आलीय. मुंबई एकूण 17 कंटेनमेंट झोन आहेत. मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत एकूण 123 इमारती सील केल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 41 दिवसांवर पोहचलाय.