breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

८० वर्षांत पदार्पण करतोय, आता या वयात आपण थांबायचं…शरद पवारांची विधानाची चर्चा

मुंबई | महाईन्यूज

राज्य ६० व्या वर्षांत पदार्पण करतंय आणि मी ८० वर्षांत पदार्पण करतोय. आता या वयात आपण थांबायचं, आता कसलं व्हिजन बघत बसायचं. व्हिजन बघण्यासंबधीचं काम नव्या पिढीकडे द्यायचं आणि आपण बघत राहयचं त्यांच्याकडे. अलीकडे मी तेच काम करतोय, सुपूर्द केलं आहे काम आणि त्याच्याकडे मी बघत बसतो, काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यातून राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिल्याचे दिसत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं व ते काय करतात हे पाहायचं, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही. असंही ते म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांना व्हिजन देत त्यांच काम मी पाहत असतो, त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसतं, त्यामुळं तुमचा मान राहत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button