Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
२६ जानेवारीपासून सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील दीड लाख नागरिकांकडून आस्वाद…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-30.png)
मुंबई | महाईन्यूज |
राज्यात २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील एक लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी लाभ घेतला आहे. अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1Pune_Shiv_Thali_receiving_g_0.jpg)
‘राज्यातील गरीब, गरजूंना सवलतीत जेवण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘शिवभोजन’ ही आमची महत्त्वाकांक्षी योजना असून तिची राज्यात काटेकोर, व्यवस्थित अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत राज्यात १२६ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून गरीबांना १० रुपयांत जेवण देण्यात येत आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता भविष्यात याची व्याप्ती वाढवण्यात येईल’, असेही भुजबळ यांनी सांगितले.