हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी
![Hemant Nagarale as the Director General of Maharashtra Police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/hemant-nagrale-mahasanchalak.jpg)
मुंबई – वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी आता हेमंत नगराळ यांची नियुक्ती झाली आहे. हेमंत नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून दिल्लीसह महाराष्ट्रातील अनेक राज्यात सेवा बजावली आहे.
वाचा :-MPSCच्या परीक्षा मार्चमध्ये होण्याची शक्यता
कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपुरचे असून येथील भद्रावती जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केलं.
ते 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.