हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/harbour-railway12.jpg)
कॉटन ग्रीन स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने सोमवारी सकाळी हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि तेही गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
कॉटन ग्रीन स्टेशनजवळ सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसटीएस) जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेचे पथक घटनास्थळी असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या तासाभरापासून हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प आहे. तर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूकही १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. दहीहंडीनिमित्त मुंबईतील सरकारी कार्यालयांना सुट्टी असली तरी खासगी कंपन्यांची कार्यालये सुरु आहेत.