breaking-newsमुंबई
#waragainstcorono:हाताला थुंकी लावून हस्तांदोलनाचा टिक टॉक वर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट , मुंबईत दोघांवर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200423_143434.jpg)
मुंबई : एकीकडे संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरोधात एकवटलेला असताना काही जण टिक टॉकच्या माध्यमातून मूर्खपण करत आहेत. टिक टॉकवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणं दोघांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईजवळच्या मिरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादीफ खान आणि इरफान असं दोघांची नावे आहेत. हा व्हिडीओ सादीफ खानच्या टिक टॉकच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.
एका महिलेने कानशीलात मारल्यावर, त्याने आणि त्याच्या मित्राने हाताला थुंकी लावून, तिच्याशी हस्तांदोलन केलं, असं चित्रण या टिक टॉक व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडीओ सगळीकडे शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला होता.