breaking-newsमुंबई

सुशांत सिंहच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला अनेक वळणं येत आहेत. आधी सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. आता सुशांतच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “माझं मन मला सांगतंय की पंतप्रधान मोदी नेहमीच सत्यासोबत आणि सत्यासाठी उभे राहतात. आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. आमचाही आत्ता कुणी गॉडफादर नाही. तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. तसेच या प्रकरणाचा तपास योग्यरितीने व्हावा, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये याकडे लक्ष द्यावे. मला न्यायाची अपेक्षा आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button