breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी – गृहमंत्री देशमुख

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरुन राजकारण आणखी जोरात सुरु झाले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. या तक्रारीसंदर्भातलं निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे. या सगळ्याला भाजपनंही उत्तर दिले आहे. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात महाआघाडी सरकारवर विरोधक सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. पण आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी भाजपचे कनेक्शन काय, असा सवाल करत काँग्रेसने हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी लावून धरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button