breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोधच : विजय वडेट्टीवार

मुंबई | महाईन्यूज

सावरकरांवरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानात पाठवा, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच केलेलं होतं. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी ते बोलत होते.

सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध असणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका राऊतांना लखलाभ”, असेही ते म्हणाले. तसेच भविष्यात संजय राऊतांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे,’ अशी माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button