शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून, 12 संशयित ताब्यात
![Ten people, including a former corporator, have been booked for defrauding a bank through forged documents](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/crime-13-1.jpg)
केज | शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची खळबळजनक घटना मांगवडगाव (ता.केज) येथे आज (दि.१३) रोजी मध्यरात्री घडली. प्राथमिक माहितीनुसार हा सामूहिक हल्ल्यातून तिघांचा खून झाला असून अन्य एक जखमी आहे. तालुक्यातील मांगवडगाव येथील शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांसह अन्य एका व्यक्तीवर गावातील काही व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. यात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.
केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले. अन्य एकास रुग्णालयात उपचारार्थ पाठविले आहे. याप्रकरणी 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी मध्यरात्री 3 च्या सुमारास भेट. यावेळी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, 12 संशयितांना ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, केजचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, युसूफ वडगावचे सपोनि. आंनद झोटे यांनी दिली आहे.