Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर… पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निलेश राणेंची टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/s.jpg)
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेता निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. निलेश राणे यांनी बुधवारी ट्वीट करून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. ‘शेण खाल्ल्यानंतर मंत्री असल्याची लाज वाटत असेल तर फक्त सोशल मीडियावर मंत्रिपदाचा उल्लेख पुसून काही होणार नाही… खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजूला हो.’, अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावलेला आहे.