breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शरद पवारांच्या समर्थनार्थ ट्विट करत राहुल गांधींचा सरकारवर टीका

मुंबई | महाईन्यूज |प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. याप्रकरणी शरद पवार यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी पुढे आले आहेत. राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट करत सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुका एका महिन्यावर असताना विरोधी पक्षांच्या आणखी एका नेत्याला सत्ताधाऱ्यांनी लक्ष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुडाचं राजकारण सुरु आहे’ असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचसंबंधित शरद पवार आज ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ईडीकडून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नसताना देखील शरद पवार आज दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे ईडी कार्यालय परिसरासह दक्षिण मुंबईतील अनेक भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात गर्दी करु नका असे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button