breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
‘वाँटेड’ गॅंगस्टर एजाज युसूफ लकडावाला अखेर जेरबंद; मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई | महाईन्यूज| प्रतिनिधी
‘वाँटेड’ गॅंगस्टर एजाज युसूफ लकडावाला याला मुंबई पोलिसांनी काल रात्री पाटणा येथे अटक केली. त्याच्याविरुध्द २५ खंडणीचे गुन्हे, विविध ८० तक्रारी आणि ‘मोक्का’ अन्वये काही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दाऊद, छोटा राजन, छोटा शकील यांच्यासोबत लकडावाला काम करत होता आणि नंतर विभक्त होऊन स्वतंत्रपणे काम करू लागला. लकडावला याचे अजून कोणत्या गुन्हेगारांशी आणि गँगस्टर सोबत कनेक्शन आहेत का हे तपासले जाईल, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
एजाज लकडावाला याच्यासारख्या कुख्यात गॅंगस्टरला पकडणे, हे पोलीस खात्याचे मोठे यश आहे.