breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस ही राजकीय सुडबुद्धीने- आदित्य ठाकरे
मुंबई – पीएमबी बँक गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला आहे. यामुळे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. ईडीची कारवाई राजकीय हेतूने झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.