breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/CoronaVirus-1.png)
मुंबई | राज्यात कोरोनाने प्रचंड हातपाय पसरले आहेत. मुंबई या संसर्गाचं केंद्र झालं आहे. आता मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे.
मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. वरळी कोळावाडा परिसरात काल संशयित रुग्ण आढळल्याने, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच हा परिसर सील केला होता. कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इथे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली.