Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
लैंगिक शोषणाची तक्रार, चौकशीसाठी अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्थानकात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Anurag-Kashyap.jpg)
मुंबई | पायल घोष प्रकरणी चौकशीसाठी बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आज (1 ऑक्टोबर) वर्सोवा पोलिस स्थानकात हजर झाला आहे. अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या लैंगिक शोषण तक्रारीनंतर अनुरागला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. अनुराग सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला असून, त्याला यासंबंधी प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्याने पायलने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, तिला न्याय मिळेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले होते.