Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रेल्वेची एनएमएमटी बसला धडक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/1-4-1.jpg)
मुंबई – सानपाडा-जुईनगर अंतर्गत मार्गावर असणाऱ्या कारशेड नजीक विना फाटकाच्या रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनचा हॉर्न ऐकूनही तिकडे दुर्लक्ष करीत NMMT ची बसगाडी रुळावर नेल्याने रेल्वेची बसला धडक बसली. या अपघतात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना नेरूळ येथील डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच एनएमएमटीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी नलावडे, अधिकारी अनिल शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वाशी ते उलवे या १८ क्रमांकाच्या बसमध्ये एकूण १२ प्रवासी होते. त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये जीवितहानी कुठलीही झाली नाही. या अपघातात एनएमएमटी बसचा चालका बाजूकडील पत्रा पूर्ण तुटला आहे. बसचे नुकसान झात्याचे एनएमएमटी अधिकार्यांनी सांगितले.