breaking-newsमुंबई

राज्य गुप्तवार्ता विभागातील निरीक्षक आझम पटेल यांचे कोरोनाने निधन

मुंबई – मुंबईवरील २६/११च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि या हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवणारे पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचे कोरोनामुळे काल सकाळी निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. आझम पटेल हे एसआयडीमध्ये (राज्य गुप्तवार्ता विभाग) पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.

पटेल यांच्यावर सैफी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्यांना न्यूमोनियादेखील झाला होता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २००१च्या बॅचचे पटेल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर मुंबई पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे. पटेल यांनी ६/११च्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. त्यांनी तपासातून या हल्ल्याचे मोड्यूल उघडकीस आणले होते.

आझम पटेल यांनी दक्षिण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावली होती. तसेच दहशतवादी संघटना इसिसशी कनेक्शन असल्याच्या संशयावरून कल्याणमधील तरुणांवर कारवाई करण्यातदेखील पटेल यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मुंबई पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला असल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button