breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दर महिन्याला पाच हजार रुपये

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात सर्वांचीच आर्थिक बाजू कोलमडली आहे. त्यातच, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिन्याला ५ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ज्या महिलांना मुलं आहेत, त्यांना अधिकचे २५०० हजार रुपये मिळणार आहेत. राज्यातील अधिकृत वेश्या महिलांनाच (Commercial Sex Workers) ही मदत मिळणार आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना ही रक्कम कोविड रिलिफ फंडातून दिली जाणार आहे. २८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालायने सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना रेशन आणि ५ हजार रुपयांची आर्थिक मदत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

एकट्या सातारा जिल्ह्यात अधिकृत १५४ वेश्या महिला आहेत. सातारा जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण अधिकारी रोहिणी धावले म्हणाल्या की, जिल्ह्यातील ३४ महिलांना ७५०० रुपये मिळणार आहेत. तर, जिल्हाधिकारी शेखर सिंग म्हणाले की राज्य सरकारने दिलेला हा प्रस्ताव अंतिम टप्प्यावर असून लवकरच निधीचे वाटप करण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button