breaking-newsमुंबई

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान ‘राजगृह’वर काल (७ जुलै) संध्याकाळी झालेल्या तोडफोड प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी करवाई केली आहे. पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल (७ जुलै) दोन अज्ञातांनी नासधूस केली. राजगृहाच्या खिडकीच्या काचाही फोडल्या आणि घरातील कुंड्यांची नासधूस केली. या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचंही नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button